आपण कुठे ट्रीपला गेलो असताना किंवा अगदी भर रस्त्यातही चारचाकीला काही झाले तर आपण गाडीतल्या सगळ्यांना आणि कुणीच नसेल तर आजूबाजूच्यांना धक्का मारण्याची विनंती करतो. मग धक्क्यामुळे ही गाडी सुरु होते किंवा किमान गॅरेजपर्यंत पोहोचते. पण ट्रेनला धक्का मारल्याचे तुम्ही कधी ऐकलंय?
नाही ना?
पण मुंबईत असा प्रकार नुकताच झाला. बंद पडलेली ट्रेन रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी जोर लावून ढकलली. विशेष म्हणजे ट्रेन ढकलणाऱ्या त्या रेल्वे कर्मचाऱ्यांना रेल्वेने १० हजार रुपयांचा बक्षीस जाहीर केले आहे.
हे बक्षीस हमाल, रेल्वे पोलीस पथकातील कर्मचारी आणि स्टेशन स्टाफमधील कर्मचाऱ्यांमध्ये वाटण्यात येणार आहे. या सर्वांनी बंद पडलेली ट्रेन धक्का लावून डेड एंडपासून प्लॅटफॉर्मपर्यंत नेण्यास मदत केली. यामध्ये जवळपास ४० जणांनी सहभाग घेतला होता. मुंबई सेंट्रलहून लखनऊला जणारी ही ट्रेन अचानक काही कारणाने बंद पडल्याने अशाप्रकारे धक्का मारत ती सुरु करावी लागली. सिग्नल पार करुन ट्रेन डेडएंडपर्यंत पोहोचली होती. मात्र पुढे ओव्हरहेड वायर नसल्याने ती जागीच थांबली होती.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews